The Struggle between Man and Life | माणूसकी आणि आयुष्याचा संघर्ष

The Struggle between Man and Life | माणूसकी आणि आयुष्याचा संघर्ष

The Struggle between Man and Life | माणूसकी आणि आयुष्याचा संघर्ष

माणसा तुझा धर्म कसा माणूसकीचा,
सदैव वाटे हा जिव्हाळ्याचा..
गरज पडता करतोस वापर एखाद्याच्या मनाचा,
नसे भान तुला त्याच्या अंतरात्म्याचा..

असा कसा हा तुझ्या विचारांचा गुंता,
मनाला सदैव सतावते चिंता..
भितीचे सावट असते सदा उरात,
जणू काही वाहून गेला संसार सारा पुरात..

नशिबाची खेळी ना चुके कोणाला,
मग का द्यावा ताण मनाला..
आयुष्याचा खेळ-खंडोबा वाटे क्षणा-क्षणाला,
त्यातही सावरू पाहतो मी स्वतःला..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या