माणुसकीचा धर्म : विचार, चिंता आणि आयुष्याचा संघर्ष
माणसा, तुझा धर्म कसा माणुसकीचा,
सदैव वाटे तो जिव्हाळ्याचा.
गरज पडता करतोस वापर दुसऱ्याच्या मनाचा,
नसे भान तुला त्याच्या अंतरात्म्याचा.
असा कसा हा तुझ्या विचारांचा गुंता,
मनाला सतत सतावते चिंता.
भीतीचे सावट असते सदा उरात,
जणू वाहून गेला संसार सारा पुरात.
नशिबाची खेळी ना चुके कोणाला,
मग का द्यावा ताण या मनाला?
आयुष्याचा खेळ वाटे क्षणा-क्षणाला,
तरीही सावरू पाहतो मी स्वतःला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा