DJ vs वाद्यपथक - संस्कृति पलीकडील पुरावे
म्हणे, पालिकेने DJ वर मिरवणुकीत बंदी आणली आहे. असो मी ह्या मुद्द्याचा वापर इथे करणार नाही. पण चला थोडी तुलना करूनच बघूया, DJ आणि पारंपरिक वाद्यांमध्ये.
DJ म्हणजे ते 2 TOP 2 Base आणि एक मिक्सर आणि त्याच्या जोडीला असते ती मशीनची संगत. एकदा लावली कि फक्त एक माणूस तिथे काम करणार. आणि त्याचा आवाज कर्णकर्कश.
आता तुम्ही म्हणाल मग वाद्यांचा आवाज सुद्धा कर्णकर्कश्य आहेच की. पण मंडळी खरे पाहता DJ वर जी गाणी वाजतात ती प्राथमिकता ह्याच वाद्यांपासून बनलेली असतात. आणि हि वाद्ये आपली संस्कृती सुद्धा आहेत.
ह्या AI च्या आधुनिक युगात तरुणाईची वाद्य वाजवण्याची, ही कला शिकण्याची ओढ पाहून मन समाधानी होत. अगदी ते ट्रेंड आहे ना सालटी गेली तरी चालतील पण धून वाजलीच पाहिजे.
हा थोडी खंत आहे की ह्या कलेला सुद्धा स्पर्धेचं स्वरूप लागलं आहे. पथकांवर पथके उभी राहत आहेत. आमने सामने आले की मग चढाओढ पाहायला मिळते.
पण ही चढाओढ कलेतून कलेला दिलेला एकप्रकारचा सन्मानच म्हणावा लागेल.
वाद्यांचे अनेक प्रकार आहेत.
- ढोल
- ताशा
- झांज
- हलगी
- लेझीम
- टाळ
- ड्रम सेट
- ध्वज/निशाण
आणि समजा ढोल पथक असेल तर मोठमोठे ढोल, इत्यादी. पण ही कला सादर करण्यासाठी लागणारी जी मेहनत आहे ती कधीच जात विचारात नाही. मग तो ROTO वाजवणारा "इस्माईल" जरी असला आणि Key - Board वाजवणारा "सूर्या" जरी असला तरी.
अगदी ट्रक मधून सामान उतरवण्यापासून ते सेटअप लावून पोरांना चहा पाण्याची सोय करण्यापर्यंत निस्वार्थी भावना असते ह्या वादकांमध्ये.
आणि इथे प्रत्येकाला वेगळा सन्मान असतो. स्थानिक स्थरावर जरी हे एकमेकांना टोपण नावाने हाक मारत असले तरी पथकात आल्यावर मात्र मूळ नावानेच आवाज देतात.
कारण तिथे सामाजिक बांधिलकी जपणे महत्वाचे असते. त्यात काही नमुने असतात जसे की, आमच्यापेक्षा चांगलं कोण वाजवूच शकत नाही, पण त्या बिचार्यांना कोण सांगणार की खरी वाजवण्याची कला तर नशिबामध्ये असते.
नशिबाने वाजवायला सुरुवात केली की कोणाचीच चालत नाही.
असो, हा मस्करीचा भाग होता, पण खरंच ह्या उनाडग्यांना नाव ठेवण्याऐवजी एकदा त्यांची मेहनत स्वतः उभे राहून बघा. मग समजेल.
आणि वाद्य पथके ही पारंपरिक वारसा चालत आलेली आहेत. हे DJ - Dolby आता कुठे तंत्रज्ञानाच्या जोरावर चालत आहेत.
त्यामुळे ह्या वादनाच्या कलेला आणि वादकाला सन्मान पूर्वक वागणूक भेटलीच पाहिजे.
राहिला प्रश्न, ज्यांचे मोठं मोठे DJ सेटअप आहेत त्यांचा, तर मंडळी तुम्हाला पूर्णतः बंदी आणलेली नाही, फक्त नियमांची बंधने आहेत.
त्यांचे पालन करून तुम्ही तुमची सेवा परवु शकता. शेवटी तुमच्या उदर्निवाहाचा मुख्य मार्ग तोच आहे.
तात्पर्य:
मुळात DJ ही जरी आधुनिक आवड असली तरी वाद्ये ही परंपरा आहे.. ऊर्जा आहे. त्यामुळे कोणीही कोणाला कमी लेखू नये.
पण प्रथम स्थान हे मी तरी वाद्य आणि वादकांनाच देईन, कारण वाद्यांमधून जेव्हा स्वर निघतील तेव्हाच तर DJ आणि Dolby वाजतील ना...
.png)
0 टिप्पण्या