स्वप्न आणि वास्तव : नजरेत हरवलेले क्षण
नकळत नजरेत तिच्या
शोधत होतो स्वतःलाच मी,
का कुणास ठाऊक, तिला
निरखून पाहत होतो मी.
शोधत होतो स्वतःलाच मी,
का कुणास ठाऊक, तिला
निरखून पाहत होतो मी.
पुढल्याच क्षणी तिने
नजरेला नजर भिडवली,
तितक्यात माझी निद्राच
अचानक भंग पावली.
स्वप्नपरीच जणू होती ती,
म्हणूनच कदाचित अशी झाली;
काय ते, ती स्वप्नातच राहिली,
आठवणींनाही तिच्या
पूर्णविरामाची कडी लागली.
न विसरणारा तो क्षण,
जीव कासावीस झाला माझा;
चोहीकडे दरवळला गंध
तिच्या मधाळ लावण्याचा.
म्हणूनच की काय,
नकळत नजरेत तिच्या
शोधत होतो स्वतःलाच मी.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा